गोविंदांसाठी मोठी बातमी! राज्य सरकार ७५ हजार गोविंदांना विमा कवच देणार

मुंबई : दहिहंडीचा उत्सव जवळ आल आहे. ६ सप्टेंबरला जन्माष्टमी आहे. तर ७ सप्टेंबरच्या दिवशी दहीहंडीचा उत्सव रंगणार आहे. त्याच अनुषंगाने राज्य सरकारने गोविंदांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. गोविंदांच्या विम्यासाठी १८ लाख ७५ हजारांची रक्कम राज्य सरकारने मंजूर केली आहे. ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत शासकीय विमा कवच लागू असणार आहे.
राज्य सरकारने गोविंदासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने १८ लाख ७५ हजार विमा कवच रक्कम मंजूर केली असून याबद्दलचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अतिरिक्त २५ हजार गोविंदाना राज्य सरकारने विमा कवच दिलं आहे. याआधी ५० हजार गोविंदाना शासकीय विमा कवच देण्याचे ठरवले होते. त्यात २५ हजार गोविंदांची भर पडल्याने आता एकूण ७५ हजार गोविंदांना या विम्याचं कवच मिळणार आहे.
हेही वाचा – ‘ब्रम्हदेव खाली आले तरी २०२४ पर्यंत मंत्रिपद घेणार नाही’; बच्चू कडू यांचं विधान
प्रो गेविंदा या शासकीय दहिहंडीसाठी राज्य सरकारने गोविंदांना दिले शासकीय विमा कवच दिले आहे. प्रो गोविंदा दहिहंडी दरम्यान गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास अथवा गंभीर जख्मी झाल्यास हा शासकीय विमा कवच गोविंदांना लागू होणार आहे. ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत हे शासकीय विमा कवच लागू राहणार आहे.





