Breaking-newsआंतरराष्ट्रीयराष्ट्रिय
सिंगापूर-भारताचा संयुक्त हवाई सराव

सिंगापूर | महाईन्यूज
सिंगापूरच्या हवाई दलाने भारतासमवेत प्रशिक्षण सरावासाठी प्रगत एफ १६ लढाऊ विमाने तैनात केली असून भारतीय हवाई दलाची सहा सुखोई लढाऊ विमाने या प्रशिक्षणात सहभागी होत आहेत.पश्चिम बंगालमधील कलाईकुडा हवाई दल केंद्रावर संयुक्त लष्करी सराव करण्यात येणार असून रिपब्लिक ऑफ सिंगापूर एअरफोर्स व भारतीय हवाईदल यांचा त्यात समावेश आहे.
१२ डिसेंबपर्यंत हा सराव चालणार आहे. संयुक्त लष्करी कवायतींचे हे दहावे वर्ष असून यात हवाई सागरी प्रशिक्षणाचा समावेश आहे. भारतीय नौदलाची यंत्रणा यात वापरली जाणार आहे, असे सिंगापूरच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. रिपब्लिक ऑफ सिंगापूर एअरफोर्सने सहा एफ १६ सी/डी लढाऊ विमाने तैनात केली असून भारतीय हवाई दलाने सहा एसयू ३० एमके आय लढाऊ विमाने तैनात केली आहेत.





