breaking-newsआंतरराष्टीय

लंडन ब्रिजवर झालेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी

  • दहशतवादी कृत्य; पोलिसांना संशय

लंडन | सुप्रसिद्ध लंडन ब्रिजवर शुक्रवारी झालेल्या भोसकाभोसकीच्या प्रकारामध्ये अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त असून पोलिसांनी याप्रकरणी एका इसमाला अटक केली आहे. त्याचप्रमाणे या प्रकाराकडे पोलीस दहशतवादी कृत्य म्हणून पाहात आहेत.लंडन शहरात झालेल्या या घटनेमुळे खळबळ माजली असून पोलिसांनी या परिसराला वेढा घातला आहे. या घटनेनंतर तेथे मोठा पोलीस बंदोबस्त आणि आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आली आहे.

या घटनेचा सविस्तर तपशील हाती आला नसला तरी सुरक्षा दलांनी एका इसमाला गोळ्या घातल्याचे ही घटना पाहणाऱ्यांनी सांगितले आहे.हा प्रकार नक्की कोणत्या कारणास्तव घडला हे सुस्पष्ट झाले नसले तरी आम्ही याकडे दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टिकोनातून पाहात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. लंडन रुग्णवाहिका सेवेने ही मोठी घटना असल्याचे म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button