Breaking-newsराष्ट्रिय

रंजन गोगोई होणार पुढील सरन्यायाधीश

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमांकाचे वरिष्ठ न्यायाधीश रंजन गोगोई यांची भावी सरन्यायाधीश म्हणून निवड निश्‍चित करण्यात आली आहे. येत्या 3 ऑक्‍टोबर रोजी ते सरन्यायाधीश पदाची सूत्रे स्वीकारतील, असे सूत्रांनी सांगितले आहे.

आतापर्यंतच्या परंपरेनुसार भावी सरन्यायाधीश म्हणून न्या. गोगोई यांच्या नावाची घोषणा सरन्यायाधीश दीपक मिश्रा लवकरच करतील. सरन्यायाधीश दीपक मिश्रा 2 ऑक्‍टोबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर 3 तारखेपासून पुढील वर्षी 17 नोव्हेंबरपर्यंत न्या गोगोई हे सरन्यायाधीश पदावर कार्यरत राहतील.

भावी सरन्यायाधीश म्हणून शिफारस करण्याची सूचना विधी मंत्रालयाकडून सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना अलिकडेच करण्यात आली होती. त्यानुसार न्या. गोगोई यांच्या नावाची शिफारस झाल्याचे समजते आहे. जानेवारी महिन्यात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातील चार वरिष्ठ न्यायाधीशांनी उघडपणे पत्रकार परिषद घेऊन बंड पुकारले होते.

सुनावणीसाठीच्या प्रकरणांचे वाटप करताना सरन्यायाधीश अधिकारांचा गैरवापर करतात असा आरोप करणाऱ्या त्या चौघांमध्ये न्या. रंजन गोगोई हे देखील होते.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button