breaking-newsराष्ट्रिय

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन व पत्नी रूपी सोरेन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

रांची – झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो)चे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन व त्यांची पत्नी रूपी सोरेन यांना कोरोनाचीबाधा झाली आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सोरेन दाम्पत्याला रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. त्यांचे पुत्र मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

याबाबतची माहिती स्वतः हेमंत सोरेन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून देताना आपल्या आईवडिलांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे म्हंटलेआहे.

तत्पूर्वी, शिबू सोरेन यांच्या निवास्थानी तैनात असलेल्या 17 कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर शिबू सोरेन आणि त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. अशातच आता दोघांचीही चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. ७४ वर्षीय शिबू सोरेन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने राज्यभरात चिंतेचे वातावरण आहे.

शिबू सोरेन आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची निवासस्थाने वेगवेगळी असली तरीही सावधगिरी म्हणून हेमंत सोरेन यांचीही कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. त्यांच्या पहिल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी 24 ऑगस्टला त्यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी केली जाईल.

याआधी झारखंडचे कॅबिनेट मंत्री बन्ना गुप्ता कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. मंत्रीमंडळाच्या बैठकीला गुप्ता यांनी हजेरी लावली होती. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री, अधिकारी हजर होते. बन्ना गुप्ता यांना कोरोना झाल्याने मंत्रिमंडळाचीही कोरोना टेस्ट केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button