Breaking-newsराष्ट्रिय

जेएनयू आंदोलनप्रकरणी दोन गुन्हे दाखल

  • कारवाई न करण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी

वसतिगृहाच्या शुल्कवाढीच्या निषेधार्थ जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांनी केलेल्या निदर्शनांसंबंधात दिल्ली पोलिसांनी मंगळवारी दोन एफआयआर दाखल केले आहेत, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.यापैकी एक एफआयआर किशनगड पोलीस ठाण्यात, तर दुसरा लोधी कॉलनी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. याबाबत जेएनयू विद्यार्थी संघटनेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

जेएनयूच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सोमवारी केलेल्या निदर्शनांमुळे शहरातील विविध भाग ठप्प झाले होते. शुल्कवाढीच्या निषेधार्थ गेल्या तीन आठवडय़ांपासून विद्यार्थी निदर्शने करीत आहेत.दरम्यान, वसतिगृह शुल्कवाढीविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रशासकीय अथवा कायदेशीर कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी मंगळवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेने मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सहसचिव जी. सी. होसूर यांच्याकडे केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button