Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्‍यातील हवामानात मोठा बदल, पुढील काही दिवस महत्वाचे

मुंबई : राज्यासह देशात वातावरणात मोठा बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस, थंडी तर मध्येच उकाडा अशी स्थिती आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. मात्र, असे असतानाही राज्यात म्हणावा तेवढा गारठा नाही. सकाळी आणि संध्याकाळी थोडी थंडी जाणवत आहे, दुपारी उकाडा जाणवतो. जानेवारी महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात थंडी जास्त होती. जानेवारी महिन्यातही थंडी कायम राहण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज होता.

मात्र, प्रत्यक्षात उलट झाले आणि उकाडा जाणवत आहे. दुसरीकडे सध्या राज्यातील काही शहरांत प्रचंड वायुप्रदूषण वाढल्याचे बघायला मिळत आहे. कडाक्याची थंडी पडली. पुढील काही दिवसांत राज्यातील तापमानात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. यामुळे आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतात.

हेही वाचा –देशात सर्वाधिक वाहतूक कोंडीची ‘ही’ शहरे… पहिल्या १० शहरांमध्ये पुणे, मुंबई…

राज्यातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद निफाडमध्ये झाली. ७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद निफाडमध्ये झाली. गोंदियात ९.८ अंश सेल्सिअस तापमान होते. राज्यात गारठा कमी होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात पुढील काही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या निफाड, गोंदिया आणि धुळ्यात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.

देशातील अनेक भागात थंडी कमी-जास्त होताना दिसत आहे. मात्र, नुकत्याच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार देशातील काही भागात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. रिमझिम पावसासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कधी, थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती देशात आहे. दिल्लीमध्ये प्रदूषणात वाढ होण्याचा अंदाज आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button