Breaking-newsराष्ट्रिय
आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचे परिपत्रक नागरी उड्डाण संचालनालयाने जारी केले आहे. केंद्र सरकारने अनलॉक ४ मध्येही आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यानंतर संचालनालयाने हे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
भारतात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा जास्त रुग्ण दररोज आढळून आलेले आहेत. एका दिवसात सर्वाधिक रुग्ण जगात आतापर्यंत भारतातच आढळून आले आहे. त्यामुळे केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यातून विशेष विमानसेवांना वगळण्यात आलेलं आहे.





