breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तानाजी मालुसरे समाधीस्थळ नूतनीकरण; मुस्लिम कारागीर घडवितात दगड

कोल्हापूर |महाईन्यूज|

नरवीर तानाजी मालुसरे यांची कर्मभूमी असलेल्या पोलादपूर तालुक्यातील उमरठ गावात असलेल्या त्यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम वेगात सुरू आहे. याठिकाणी दिवस रात्र काम सुरू असून समाधीस्थळ व आसपास लागणारे दगड घडविण्याचे काम कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील मुस्लिम बांधव करत आहेत. तानाजी मालुसरे यांची 350 वी पुण्यतिथी येत्या 17 फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे.

या समाधीस्थळाच्या नूतनीकरनाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अजय देवगण, काजोल देवगण, देवदत्त नागे, शरद केळकर आणि इतर कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती उत्सव समितीचे सदस्य रामदास कळंबे यांनी दिली.

सध्या समाधीच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी खास कर्नाटकातून दगड मागविण्यात आले आहेत. कोल्हापूरचे कुशल कारागीर समाधीच्या नूतनीकरणाचे काम करत आहेत. समाधी परिसराला किल्ल्यासारखी तटबंदी करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास साकार करण्यात येणार आहे. 

पोलदपूरपासून 15 किलोमीटर अंतरावर उमरठ गाव आहे. या ठिकाणी इतिहासप्रेमी आणि पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला सर केल्यानंतर युद्धात धारतीर्थ पडले. त्यांचे पार्थिव कोंढाणा किल्ल्यावरून मढेघाट मार्गे उमरठ येथे आणण्यात येऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथेच त्यांची समाधी बांधण्यात आली. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीशेजारी शेलार मामा यांचीही समाधी आहे.

याठिकाणी लागणारे दगड कर्नाटक राज्यातून आणण्यात आले आहेत. या दगडावर करवीर तालुक्यातील पिढीजात दगड घडविण्याचे काम करणारे मुस्लिम बांधव काम करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button