ताज्या घडामोडीपुणे

सुजात आंबेडकरांविरुद्ध ब्राम्हण महासंघ आक्रमक; आनंद दवे म्हणाले

पुणे| वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकरयांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणावरून सुजात आंबेडकर यांनी मनसेवर निशाणा साधला होता. त्यानंतर दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात असे विधानही सुजात आंबेडकर यांनी केले. सुजात आंबेडकरांच्या याच विधानावरून आता ब्राम्हण महासंघाने (Brahman Mahasangh) आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. सुजात यांच्याकडून शहाणपणाच्या वक्तव्याची अपेक्षा कधीच नव्हती, असा शब्दात ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे  आंबेडकर यांच्यावर प्रहार केला आहे. (president of brahman mahasangh

सुजातकडून शहाणपणाच्या वक्तव्याची आमची अपेक्षा या आधीही कधीच नव्हती आणि आताही नाहीये. त्यामुळे सुजाता आंबेडकरांच्या वक्तव्याच्या आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो, असे आनंद दवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे. दंगली ब्राम्हण घडवतात हे म्हणण्याआधी काल परवा राम नवमीला देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या आहेत. त्या कोणी केल्या?, याचे उत्तर सुजात आंबेडकर किंवा प्रकाश आंबेडकर यांनी द्यावे, असेही आनंद दवे म्हणाले आहेत.

सुजात आंबेडकर यांच्या वक्तव्याचा निषेध करताना दवे पुढे म्हणाले की, अफगाणिस्तानमधील भगवान बुद्धाच्या प्रतिमांची तोडफोड कोणी केली ? याचं उत्तर सुजातने प्रकाशजींना विचारावे आणि सांगावे. तिथले उच्चवर्णीय होते की आणखी कोणी होते याचा अभ्यास सुजात यांनी करावा, असा टोला आनंद दवे यांनी लगावला आहे.

हिंदू धर्म रक्षण करण्यासाठी आज सुद्धा आमचा दलित बंधू काम करत आहे. याच कारणामुळे आज आम्ही फक्त सुजातचा निषेध व्यक्त करून थांबत आहोत, असेही दवे पुढे म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button