breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

#boycottchhapaak… दीपिकाच्या ‘या’ भुमिकेमुळे अनेक चाहते नाराज.‘छपाक’वर बहिष्कार टाकण्याची मागणी…

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला…त्यात अनेक सेलिब्रिटीजनीही या घटनेचा निषेध करत आपली प्रतिक्रीय़ा दिल्या होत्या…त्याचप्रमाणे दिपीका देखील जेएनयूच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांंची विद्यापीठात जाऊन विचारपूस केली…तिनेही हल्ल्याप्रकरणी निषेध नोंदवत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र तिच्या या भुमिकेमुळे ती चांगलीच अडचणीत सापडली..अनेकांनी छपाकच्या प्रमोशनसाठी तिने हा सर्व ड्राम केल्याचा आरोप केला आहे…

दीपिका आपला आगामी चित्रपट छपाकच्या प्रमोशनसाठी दिल्लीत होती. यावेळी तिने विद्यापीठात जाण्याचा निर्णय घेतला. दीपिका विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी जेएनयूमध्ये पोहोचली होती. मात्र तिने कोणतंही भाषण केलं नाही. सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास दीपिका पोहोचली होती. यावेळी कन्हैय्याकुमारने आजादीच्या घोषणा देण्यास सुरुवात करताच दीपिका उठून उभी राहिली होती.

दीपिका जेएनयूमध्ये पोहोचल्याची बातमी आणि फोटो समोर येताच काहींनी तिच्या या भुमिकेला विरोध दर्शवला…सोशल मीडियावर तिच्याविरोधात ट्रेंड सुरु झाला. काही वेळातच तिचा आगामी चित्रपट ‘छपाक’वर बहिष्कार टाकण्याची मागणी होऊ लागली. #boycottchhapaak हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे. दीपिका आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठीच तिथे आली होती असा आरोप काहीजणांनी केला आहे. दिल्लीत नसती तर दीपिका आलीच नसती असंही काहींचं म्हणणं आहे.

मात्र दीपिकाच्या भुमिकेचं अनेकांनी समर्थही केलं…तिच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना तिच्या समर्थकांनी ‘पद्मावत’ चित्रपटाच्या वेळी करणी सेनेने तिचं नाक कापण्याची धमकी दिली होती याची आठवण करुन दिली. तसंच चित्रपटाला फटका बसेल याची कल्पना असतानाही दीपिकाने आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचं सांगत हा पब्लिसिटी स्टंट नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. दीपिकाने घेतलेल्या या भुमिकेचा तिच्य़ा चित्रपटावर काही परिणाम होईल का? हे पाहण महत्वाच ठरणारे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button