breaking-newsआंतरराष्टीय

युक्रेनचं विमान इराणमध्ये कोसळलं; 180 जणांचा दुर्दैवी मृत्यू

तेहरान | महाईन्यूज

युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचं विमान इराणची राजधानी तेहरानमध्ये कोसळलेलं आहे. तेहरानच्या इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमातळावरुन उड्डाण करताच विमानात तांत्रिक बिघाड झाला व अपघात झाला आहे. या विमानात १८० प्रवासी होते. यातील एकही प्रवासी वाचू शकलेला नाही. इराणमधील अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं असोशिएट प्रेस या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिलेली आहे.

युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या बोईंग ७३७ विमानात उड्डाणानंतरच्या अवघ्या काही मिनिटांतच तांत्रिक बिघाड झाला व विमान कोसळताच त्याला आग लागली होती. विमानातील प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी २२ रुग्णवाहिका, चार बस रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या होत्या. मात्र विमानाला लागलेली आग भीषण असल्यानं मदतकार्य सुरूच करता आलं नाही, अशी माहिती इराणचे आपत्कालीन सेवेचे प्रमुख पिऱ्होसेन कौलीवांद यांनी दिली आहे. युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानानं बुधवारी सकाळी उड्डाण केलं होत, मात्र काही वेळातच विमानानं हवाई वाहतूक नियंत्रणाला माहिती पाठवणं बंद केलं होत. यानंतर हे विमान कोसळलं आहे. किवच्या दिशेनं जाणारं हे विमान ३ वर्षे जुनं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button