breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

न्यायाधीशांवरच हक्कासाठी न्यायालयात जाण्याची वेळ

  • निवासस्थानांच्या स्थितीबाबत याचिका

मुंबई |

राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात कनिष्ठ न्यायाधीशांना देण्यात आलेली अधिकृत निवासस्थाने दयनीय स्थितीत असल्याचा आरोप ‘महाराष्ट्र जजेस असोसिएशन’ने याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केला आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर नुकतीच या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी अधिकृत निवासस्थानाच्या संदर्भात मुंबई आणि राज्यातील उर्वरित न्यायालयीन अधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी असोसिएशनच्या वतीने अ‍ॅड्. तेजस दंडे यांनी न्यायालयासमोर मांडल्या.

याचिका करण्यापूर्वी असोसिएशनने या निवासस्थानांची पाहणी केली व न्यायालयीन अधिकाऱ्यांकडून निवासस्थानांबाबतच्या समस्या जाणून घेतल्याचेही सांगण्यात आले. तसेच यासंदर्भातील तक्रारींसाठी न्यायाधीशांना ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याबाबतचे मुख्य न्यायमूर्तींकडे निवेदन करण्याची सूचना खंडपीठाने असोसिएशनला  केली. पुणे येथील न्यायाधीशांनी या पाहणीच्या वेळी सांगितले की, त्यांच्या शौचालयाचे छत गळत आहे. वारंवार तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दुरुस्ती केलेली नाही. परिणामी शौचालयात जाताना छत्री घेऊन जावी लागते.

  • माझगाव येथील इमारतही धोकादायक स्थितीत

माझगाव येथील न्यायाधीशांच्या ‘गुलमोहर’ इमारतीतील काही घरांच्या गच्च्यांचे भाग गेल्या वर्षी पावसाळ्यात कोसळले होते. या दुर्घटनेमुळे करोनाच्या काळातही न्यायाधीशांच्या कुटुंबीयांना अन्य ठिकाणी हलवण्यात आले. ही इमारत ३० वर्षे जुनी असून मोडकळीस आलेल्या स्थितीत आहे. यावरून या इमारतींच्या बांधकामाचा दर्जा दिसून येतो. इमारतीतील बहुतांश न्यायाधीशांनी घराची गच्ची धोकादायक असल्याच्या तक्रारी केल्या. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याला काहीच प्रतिसाद देण्यात आला नाही, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button