breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

कंत्राट कोणाला दिले? नेटकऱ्याचा प्रश्न; ‘तुझ्या बापाला’, महापौरांचं प्रत्युत्तर

मुंबई – लसींसाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरसंदर्भात प्रश्न विचारणाऱ्या एका नेटकऱ्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे त्यांचं हे ट्विट आणि प्रत्युत्तर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महापौरांविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. अखेर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं.

किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ही मुलाखत त्यांनी आपल्या ट्विटरला शेअर केली होती. या मुलाखतीत त्यांनी एक कोटी लोकांना लस देण्यासंदर्भात पालिकेकडून काढण्यात आलेल्या ग्लोबल टेंडर तसंच त्याला कंपन्यांनी दिलेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला होता.

या ट्विटवर एका व्यक्तीने कंत्राट कोणाला दिले? असा प्रश्न विचारला होता. यावर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना ‘तुझ्या बापाला’ असं म्हटलं. हे ट्विट व्हायरल होऊ लागल्यानंतर महापौरांवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्यानंतर महापौरांनी अखेर हे ट्विट डिलीट केलं.

महापौरांच्या या आक्षेपार्ह भाषेवर विरोधकांनीही आक्षेप नोंदवला आहे. “मुंबईच्या पहिल्या नागरिक असल्याने लोकांना त्यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी सुसंस्कृत भाषेची अपेक्षा आहे,” असं भाजपाचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी म्हटलं आहे. समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी देखील महापौरांनी आपल्या कार्यालयाचा मान राखला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button