breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

बोपखेलची मनपा शाळा देशात सर्वोत्तम

  •  आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर; पहिल्या दहामध्ये स्थान
  •  तत्कालीन शिक्षण समिती सभापती चेतन घुले यांची दूरदृष्टी

पिंपरी : महापालिका शिक्षण समितीचे माजी सभापती चेतन घुले यांच्या दूरदृष्टीमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची बोपखेल येथील शाळा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकली आहे.

जगातील सर्वोत्तम शाळांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या नामांकन यादीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बोपखेल शाळेचे (इंग्रजी माध्यम) नाव जाहीर झाले आहे. या पुरस्कारासाठी शाळेने पहिल्या दहांत स्थान मिळवले आहे. असा पुरस्कार मिळवणारी देशातील ती पहिलीच शाळा ठरणार आहे. बोपखेल गावाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्यामुळे मोठी समाधान असल्याचे मत घुले यांनी व्यक्त केले आहे.

समाजाच्या प्रगतीत भरीव योगदान दिल्याबद्दल जगभरातील शाळांचा गौरव करण्यासाठी अमेरिकेमधील ‘T4 एज्युकेशन’ या संस्थेमार्फत दिला जाणारा ‘USD 250,000’ आज (ता. २) जाहीर झाला आहे. महापालिकेची बोपखेल शाळा गेल्या सहा वर्षापासून आकांक्षा फाउंडेशन चालवत आहे. या संस्थेचा २५ जणांचा शिक्षकवृंद आहे. ३१६ विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. या शाळेत झोपटपट्टी, वाड्यांवस्तीमधील ज्युनिअर केजीपासून ते सहावीपर्यंत मुलांना शिक्षण दिले जाते. मुंबईतील खोज स्कूल आणि पुण्यातील बोपखेल येथील पीसीएमसी इंग्लिश मीडियम स्कूल या ‘कम्युनिटी कोलॅबोरेशन’ श्रेणीतील बक्षिसासाठी निवडलेल्या टॉप १० शाळांमध्ये आहेत. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या ‘पुनरावलोकन पॅनेल’द्वारे जगभरातील शाळांमधील हजारो अर्जांची फेरतपासणी केल्यावर बोपखेल शाळेची निवड करण्यात आली.

महापालिका शिक्षण समितीचे सभापती म्हणून काम करताना विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयी-सुविधा पुरवल्या. बोपखेलसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी म्हणून ते कुठेही कमी पडू नये यासाठी अनेक बदल केले त्याची प्रचिती आता येत आहे. माझ्या बोपखेल गावातील प्रत्येक गोरगरीब विध्यार्थंना इंग्लिश माध्यमांमध्ये शिकता यावे. यासाठी केलेला प्रयत्न आणि त्याची प्रचिती आता येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button