breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमुंबईराजकारणराष्ट्रिय

उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीत बोट बुडाली : 32 जण बचावले, दोघांची प्रकृती गंभीर

वाराणसी । महाईन्यूज ।

वाराणसी जिल्हा प्रशासनाचा हलगर्जीपणा पर्यटकांच्या जीवावर बेतला आहे. दक्षिण भारतातील 34 पर्यटकांना घेऊन जाणारी ओव्हरलोड बोट शनिवारी सकाळी अहिल्याबाई घाटातील गंगेत बुडाली आहे. यातील दोन जणांना वाचवण्यात यश आले असून यातील 32 जण अद्याप बेपत्ता आहेत. मात्र बचावलेल्या दोघांची प्रकृती अद्याप गंभीर आहे.

स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, बोटींग करत असताना अचानक ही 34 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट बुडाली. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ (NDRF) आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं आहेत. दरम्यान स्थानिक लोकांच्या मदतीने आता सर्व पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांनी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेनंतर आरडाओरडा सुरु झाल्याने अनेकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. मात्र यात दोघांची प्रकृती चिंताजनक झाली त्यामुळे त्यांना रुग्णालया त दाखल करण्यात आले, हा अपघात होताच नियमांचे पालन न करणाऱ्या बोटचालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

वाराणसीत आज सकाळी 7.00 च्या सुमारास अहिल्याबाई घाटासमोर (Ahilyabai Ghat) प्रवाशांनी भरलेली बोट अचानक बुडू लागल्याने मोठा अपघात झाला. गंगेत बोट बुडाल्याचे समजताच परिसरात एकचं भीतीचे वातावरण निर्माण झाले. वाराणसीचे पोलीस आयुक्त ए सतीश गणेश यांनी बोट दुर्घटनेनंतर पीडितांशी संवाद साधला. सर्व पीडित आंध्र प्रदेशातील राजमुंद्री जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button