Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

रात्री चालताना बाईकने उडवलं, मदत न करतात पळाला; कोणीही नाही बघितलं

परभणी : भीक मागून खाणारा व्यक्ती रात्री दोन वाजता परळी रोडने पायी जात असताना एका दुचाकी स्वराने त्याला उडवून मदत न करताच पळ काढला. सदरील भिकाऱ्यांनी मदतीच्या अशाने रोडच्या बाजूलाच संपूर्ण रात्र काढली मात्र मदतीसाठी एकही वाहनधारक थांबला नाही. सदरील घटना परभणीच्या गंगाखेड शहरामध्ये घडली आहे. त्यामुळे खरंच माणुसकी संपली आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

छत्तीसगडमधील अमर वासुदेव जीवनमाने हे भीक मागून आपली उपजीविका भागवतात एक वर्षापूर्वी छत्तीसगडमधील बिलासपुर इथे घराबाहेर पडले आहेत. तेव्हापासून ते वेगवेगळ्या शहरांमध्ये भिक मागून आपली उपजीविका भागवतात. ते दोन दिवसांपूर्वी गंगाखेड शहरांमध्ये आले होते. रात्र झाली की ते रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये झोपतात. ८ ऑगस्ट रोजी दिवसभर गंगाखेड शहरात भीक मागितल्यानंतर ते रात्री झोपण्यासाठी परळी रोडवरील मार्केट यार्डकडे रात्री दोन वाजता पायी जात होते.

याचीवेळी परळीकडून गंगाखेडकडे येणाऱ्या एका अज्ञात दुचाकीने अमर जीवनमाने यांना धडक दिली. त्यांच्या उजव्या पायाला धक्का लागल्याने ते खाली पडले. असे असतानाही दुचाकीस्वार मदत न करता त्या ठिकाणावरून निघून गेला. कोणीतरी मदत करेल या आशेने अमर जीवनमाने रात्रभर नांदेड – पुणे या महामार्गावर बसून राहिले. मात्र, नेहमी वर्दळ असलेल्या या महामार्गावर एकही वाहनधारक त्यांच्या मदतीसाठी थांबला नाही.

अखेर सकाळी ११ वाजता कोणीतरी १०८ या क्रमांकावर रुग्णवाहिकेला फोन लावून अमर जीवनमाने हे जखमी असल्याचे सांगितले त्यानंतर रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांचा पाय मोडला असल्याचे दिसून आले. याप्रकरणी अमर जीवनमाने यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकी स्वारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास गंगाखेड पोलीस करत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button