आंतरराष्टीयक्रिडाराष्ट्रिय

ऋषभ पंतच्या डोक्यातून रक्त वाहत होते अन काही तरुण त्याच्या बॅगमधून…

नवी दिल्लीः नवी दिल्ली : भारताचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारला अपघात झालाय. दिल्ली-डेहराडून महामार्गावर त्याची कार दुभाजकावर आदळल्याने तो गंभीर जखमी झाला. तसेच अपघातानंतर गाडीने पेट घेतल्याने गाडी जळून खाक झालीये. ऋषभ पंत हाच स्वत: गाडी चालवत होता. झोपेत असल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर गाडी रस्त्यावरील लोखंडी रेलिंग तोडून दुभाजकावर जोरात आदळली. यादरम्यान कित्येक वेळा गाडीने पलटी मारल्या. गाडीने रेलिंगला जोरदार धडक दिल्याने कारला आग लागली. कारचा बोनेटसह पुढचा भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे. मात्र, ऋषभ पंत आणि त्याच्या मित्रांना वेळीच गाडीतून बाहेर पडता आले आणि त्यांचा जीव थोडक्यात वाचला. कारला आग लागल्यानंतर ऋषभ पंतने स्वत: कारचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र गंभीर दुखापतीमुळे तो बाहेर पडू शकला नाही. त्याच्याकडे एक बॅग होती. त्याचवेळी अपघातस्थळी पोहोचलेल्या काही तरुणांनी ऋषभला मदत न करता त्याच्या बॅगेतील पैसे काढून तेथून पळ काढला.

त्याचवेळी त्यांनी अपघाताची माहिती पोलिसांना कळवली.पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तत्काळ सूत्रे फिरवली. पुढच्या काही मिनिटांत अपघातस्थळी रुग्णवाहिका दाखल झाली. पोलिसांनी ऋषभला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. ऋषभला भरपूर मार लागलेला होता. शरीरावर अनेक ठिकाणी जखमाही झाल्या होत्या. डॉक्टरांनी तत्काळ ऋषभवर उपचार सुरु केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कळतीये.

ऋषभ पंत अगोदरच जखमी होता…!
भारतीय क्रिकेट संघाला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर टी ट्वेन्टी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या दोन्ही मालिकेतून ऋषभ पंतला वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने त्याला वगळण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही, मात्र ऋषभ पंतला दुखापत झाल्याचे सूत्रांकडून समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button