breaking-newsराष्ट्रिय

तेलंगणात निवडणूक लढवणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला उमेदवार बेपत्ता

तेलंगणात निवडणूक लढवणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला उमेदवार चंद्रमुखी या बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. हैदराबादमधील मतदारसंघातून बहुजन डावी आघाडीकडून त्या विधानसभा निवडणूक लढवत आहे. तेलंगणामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चंद्रमुखी या पहिल्या ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्याने खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

ANI

@ANI

Chandramukhi a trans woman contesting from Goshamahal constituency in Hyderabad on a Bahujan Left Front ticket has gone missing. She is the first transgender candidate in Telangana. Police investigation underway.

२३ लोक याविषयी बोलत आहेत

चंद्रमुखी या हैदराबादमधील गोशामहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. कालपासून (मंगळवार) त्या येथील आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकेश गौड यांच्याविरोधात त्या निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर भाजपाचे टी. राजा आणि टीआरएसचे प्रेमसिंह राठोड हे देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मुदतीपूर्वीच विधानसभा बरखास्त केल्याने येथे सहा महिने आधीच निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार ७ डिसेंबर रोजी ११९ जागांसाठी येथे निवडणूक होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button