breaking-newsTOP NewsUncategorizedक्रिडाताज्या घडामोडीपुणेराजकारण

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भाजपाचे “कुस्ती” तही “धोबीपछाड”

पुणे- राज्याच्या कुस्तीक्षेत्राची शान समजल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नागपुरकर नेते रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर मागिल कांही वर्षापासुन शऱद पवार यांची होती. मात्र महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त झाली होती. हीच संधी साधत भारतीय जनता पक्षाने परिषदेवरील शरद पवार यांची सत्ता खालसा करण्याबरोबरच, नागपुरच्या रामदास तडस यांना संधी दिली आहे.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुका पार पडत असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीन जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी दोन जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे. काकासाहेब पवार आणि धवलसिंग मोहिते पाटील यांनी आपले अर्ज मागे घेतले असून रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार आहे.

कुस्तीच्या २३ वर्षांखालील स्पर्धेचे २०१९ मध्ये करण्यास नकार दिल्याच्या कथीत कारणावरुन, आयोजन भारतीय कुस्तीगीर महासंघाने कांहि दिवसापुर्वी २०१९ मध्ये २३ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन काही दिवसांपूर्वी शरद पवार हे अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली होती. भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता यासाठी निवडणुका होणार असून भाजपचे रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button