breaking-newsTOP NewsUncategorizedपश्चिम महाराष्ट्र

कर्जतमध्ये रथयात्रेत चोरी करणाऱ्या तब्बल २० जणांना अटक

कर्जत : कर्जत येथील प्रसिद्ध गोदड महाराजांच्या रथायात्रेत गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या तब्बल २० जणांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये १० महिला चोरट्यांचा समावेश आहे.

आर्यन अमिताभ निमगावकर (रा.लाईट बोर्डाचे पाठीमागे, कर्जत),आनंद रविंद्र पवार उर्फ टकशा (रा.गोरोबा टाकी जामखेड), काजल कलाकार चव्हाण उर्फ काजल अविनाश काळे (रा.वाकी ता.आष्टी), निर्मला हनुमंत जाधव, हनुमंत मुड्या जाधव (दोघेही रा.लेखानगर नाशिक), अमोल जालिंदर काळे (रा.अरणगाव मूळ गोरोबाटाकी जामखेड), किरण रावसाहेब काळे (रा.मिलिंदनगर जामखेड), सागर ताराचंद भागडे (रा.गोरोबा टाकी जामखेड), संतोष शंकर चव्हाण (रा.उरुळी कांचन), राहुल रमेश जाधव (दोघेही रा. यशवंतनगर अकलूज), गोवर्धन सुरेश काळे (रा.सदाफुलेवस्ती. जामखेड), कमल बबन फुलवरे, मंगल संभाजी शिंदे, शिला पप्पू फुलवरे (तिघेही रा.गेवराई, बीड), रोहिणी सुनील पिटेकर, स्वाती संतोष पिटेकर, राणी शरद पिटेकर (तिन्ही राहणार म्हाळंगी तालुका कर्जत) माया प्रवीण गायकवाड, सोनी जगत राकडे, इंदू आनंदा गायकवाड (तिन्ही रा. अशोकनगर तालुका जिल्हा- वर्धा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्गुरू गोदड महाराजांची रथयात्रा तब्बल दोन वर्षानंतर यंदा भरणार होती. त्यामुळे रथयात्रेचे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार होती. रथयात्रेत गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांना लुटण्यासाठी, दागिने,रोकड,चोऱ्या करण्यासाठी असंख्य सराईत चोरटे परजिल्ह्यातून, परगावाहून या यात्रेत सहभागी झाले होते. मात्र ‘नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ न देता यंदाची रथयात्रा उत्साहात पार पाडायची’ असा संकल्प करून कर्जत पोलीस मैदानात उतरले होते.

सद्गुरू गोदड महाराजांच्या मंदिराकडे भाविक दर्शनासाठी रविवारी गर्दी करत होते. तेव्हा कर्जत पोलीस आपल्या डोळ्यात तेल घालून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परिश्रम घेत होते. अंगावर पाऊस झेलत कंबरेवर हात ठेवून अगदी विठ्ठलाच्या रूपाने कर्जत पोलीस चोरट्यांना विलक्षण नजरेने हेरून गर्दीतून बाहेर काढत होते. पोलीसांची नजर पडताच चोरटे आणखी गर्दीत घुसत होते. मात्र पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नियोजनातुन लावलेल्या ट्रॅपमधून अगदी सहा तासांमध्ये एक नव्हे तर तब्बल २० सराईत चोरटे कर्जत पोलिसांच्या जाळ्यात अडकले. कर्जत पोलीसांच्या या सतर्कतेचे अक्षरशः कौतुक करावे तेवढे कमीच आहेत.

दरम्यान, वरील आरोपींवर जबरी चोरी, चोरी, चोरीचा प्रयत्न, संशयास्पद परिस्थितीत फिरणे अशा प्रकारचे गुन्हे कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले आहेत. यातील पाच आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड सुनावण्यात आले आहे. तर १२ अटक आरोपींवर अहमदनगर, पुणे सोलापूर वर्धा येथे चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. चोऱ्या होण्याच्या अगोदरच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांचे टीमने चोरटे जेरबंद केल्यामुळे चोऱ्या झाल्या नाहीत. याबद्दल समस्त कर्जतकरांनी आणि भाविकांनी कर्जत पोलिसांचे कौतुक करून आभार मानले.

ही कारवाई सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अनंतराव सालगुडे, पोलीस जवान श्याम जाधव, अंकुश ढवळे, पांडुरंग भांडवलकर, सुनील खैरे, गोवर्धन कदम, शकील बेग, ईश्वर नरोटे, मनोज लातूरकर, कोमल गोफणे, राणी व्यवहारे, बळीराम काकडे, जयश्री गायकवाड, भरत डगोरे, सलीम शेख, उद्धव दिंडे, प्रवीण अंधारे आणि शाहुराज तिकटे यांनी केली..

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button