ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने मुंबई-आग्रा महामार्गावर गॅस टँकर पलटी

धुळे | मुंबई-आग्रा महामार्गावर गॅसची वाहतूक करणारा गॅस ने पूर्णपणे भरलेला टँकर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात टँकर मधील गळती होणारा गॅस हा अत्यंत ज्वलनशील असल्याची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी महामार्ग पोलिस लागलीच दाखल झाले. आजूबाजूच्या परिसरात सतर्कतेचा ईशारा देण्यात आला. काही वेळ विद्युत पुरवठा देखील खंडीत करण्यात आला होता. गॅस टँकरचा स्फोट होऊ नये म्हणून कित्येक तास गळतीवर पाणी टाकणे सुरु होते.

असा झाला अपघात

काल सायंकाळी मुंबईकडून जळगावकडे ज्वलनशील गॅस घेऊन जात असलेल्या एका टँकरचा धुळे शहरालगत असलेल्या चाळीसगाव चौफुली जवळ ड्रायवरचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर गॅस गळती लागलीच सुरू झाली. या गॅस टँकरमध्ये १७ हजार लिटर प्रोपेलेंट हा अत्यंत ज्वलनशील गॅस असल्याचे माहिती मिळताच सर्वत्र धावपळ सुरु झाली.

धुळे शहर वाहतूक शाखेला अपघाताची माहिती मिळताच मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. महामार्ग परिसरातील दोन किलोमीटर परिसरामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची देखील माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. गॅस गळती थांबण्यासाठी जळगाव येथील अभियंत्यांना घटनास्थळी लागलीच पाचारण करण्यात आले आहे. गॅस गळती थांबवण्याचे शर्थीचे प्रयत्नअभियंत्याकडून सुरूच होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button