breaking-newsताज्या घडामोडी

‘लॉकडाउन’मध्ये परीक्षा : तळेगाव येथील विद्यालयाचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ!

– वडगाव मावळच्या तहसीलदारांचा विद्यालयावर छापा

 तळेगाव दाभाडे । महाईन्यूज । प्रतिनिधी

तळेगावमधील स्नेहवर्धक मंडळ ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्समध्ये अकरावीची परीक्षा घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वडगाव मावळच्या तहसीलदारांनी छापा टाकून महाविद्यालयाचे हे बिंग फोडले. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणा-या कॉलेज प्रशासनावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे साहजिकच सर्व परीक्षा रद्द झाल्या. असे असताना तळेगावमधील स्नेहवर्धक मंडळ ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्समध्ये परीक्षा सुरू असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. वडगाव मावळच्या तहसीलदारांनी छापा टाकून महाविद्यालयाचे हे बिंग फोडले. तेव्हा अकरावी वाणिज्य विभागाच्या परीक्षा सुरू होत्या. तसेच याप्रकरणी संचालक मंडळ, प्राध्यापक आणि तीन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे तक्रार आली होती. अकरावी वाणिज्य विभागात नापास झालेल्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येत होती, अशी माहिती तळेगाव पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी दिली. आजच्या पेपरसाठी 33 विद्यार्थ्यांना व्हाट्सऍपवर मेसेज पाठवून परीक्षा असल्याची सूचना दिली, पैकी 27 विद्यार्थ्यांना परीक्षेला येण्यास भाग पाडले. काल एक पेपर झाला तेव्हा प्रशासनाच्या कानावर ही बाब पडली. तसेच उद्या म्हणजेच आज ही पेपर होणार असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली होती. त्यानुसार आज सापळा रचण्यात आला होता. पेपर सुरू होताच पोलिसांच्या मदतीने तहसीलदारांनी छापा टाकला. तेव्हा ही धक्कादायक बाब उघडकीस आली. मग याप्रकरणी संचालक मंडळ, प्राध्यापक आणि तीन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये या सर्वांना बोलावण्यात आलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button