breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरीत कामगार दिनापासून असंघटित कामगारांसाठी अन्नछत्र सुरू 

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना या भयंकर महामारी आजारांमुळे लॉकडाऊन सुरू असून  लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे रिक्षाचालक, धुणीभांडी, स्वयंपाक, साफ सफाई कामगार, कागद-काच-पत्रावेचक, बांधकाम मजूर फेरीवाले आदी कष्टकरी जनतेचे हाल सुरू आहेत. असंघटित कामगारांची उपासमार होऊ नये यासाठी कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मागे अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने या अन्नछत्रास अधिकृत परवानगी देण्यात आली असून रोज एक हजार कष्टकरी कामगारांना दोन वेळचे जेवण देण्यात येणार आहे. चपाती, भाजी, भात, वरण असलेले पॅकेट तयार करण्यात येत आहेत, उद्योजक दिलीप तीलवानी आणि बशीर सय्यद यांच्या हस्ते १ मे कामगार दिनानिमित्त असंघटित कामगार कष्टकर्‍यांना हे पॅकेट वाटप करण्यात येते आहे. यावेळी  कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, उद्योजक राजू गीडवानी, अनिल शिंदे, कार्यध्यक्ष बळीराम काकडे, सचिव प्रल्हाद कांबळे आदी उपस्थित होते.

“रिक्षा चालक, घरेलु कामगार, बांधकाम मजूर, कागद काच पत्रा वेचक, फेरीवाले आदि कष्टकरी असंघटीत कामगार यांना चपाती, भाजी – भात, वरणाचे पॅकेट घरपोच देण्यात  येणार असून ज्यांना अन्नाचे पॅकेट पाहिजे असतील त्यांनी, बबन मिसाळ 9766072222 क्रमांकावरती संपर्क करावा, असे आवाहन पंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
   

आज covid-19 मुळे देशातील सर्व असंघटित कामगार कष्टकरी घरात बसून असून आज त्यांची सर्व कामे बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये कामगारांना १ मे च्या शुभेच्छा कशा द्यायच्या असा प्रश्न समोर होता. त्यामुळे त्यांच्यासाठी अन्नछत्र सुरू करून अन्नछत्रच्या माध्यमातून त्यांना दोन वेळचे जेवण देण्याचा उपक्रम कष्टकरी कामगार पंचायत राबवत आहे. याच खऱ्या अर्थाने १ मे कामगार दिनाच्या तमाम कष्टकरी कामगारांना शुभेच्छा आहेत, असे मत बाबा कांबळे यांनी व्यक्त केले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button