breaking-newsक्रिडा

मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यातून लिओनेल मेसीची माघार

२०१८ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनंतर लिओनेल मेसी पहिल्यांदाच अर्जेटिना संघाकडून खेळला, पण या सामन्यात त्यांना व्हेनेझुएलाकडून १-३ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. याच सामन्यात मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे मेसीला आता पुढील आठवडय़ात मोरोक्कोविरुद्ध होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्याला मुकावे लागणार आहे.

रशियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर मेसीवर आठ महिन्यांची बंदी असल्यामुळे तो सहा मैत्रीपूर्ण सामन्यांत अर्जेटिनाकडून खेळू शकला नव्हता. आता दुखापतीमुळे त्याला पुन्हा एकदा राष्ट्रीय संघाच्या सामन्यात खेळता येणार नाही. अर्जेटिना फुटबॉल महासंघाने मेसीच्या दुखापतीविषयीची माहिती दिली आहे. गोंझालो मार्टिनेझ यानेही पायाच्या दुखापतीमुळे या सामन्यातून माघार घेतली आहे.

ब्राझीलमध्ये जून-जुलै महिन्यात होणाऱ्या कोपा अमेरिका स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरू असून मंगळवारी मोरोक्को-अर्जेटिना यांच्यात होणाऱ्या सामन्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. मेसीने या सामन्यातून माघार घेतली असली तरी १० एप्रिल रोजी मँचेस्टर युनायटेडविरुद्ध होणाऱ्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या टप्प्यातील सामन्यात मेसी बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करणार आहे. सावधगिरीचा उपाय म्हणूनच मेसीला मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button