breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

सांगलीत महाकाय गव्याच्या दर्शनाने नागरिकांमध्ये भीती

सांगली | प्रतिनिधी 
सांगली वाडीतील कदमवाडीकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर शनिवारी २५ डिसेंबरला रात्री महाकाय गव्याचे दर्शन झाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री उशिरापर्यंत वनविभागाचे कर्मचारी, पोलीस आणि अग्निशमन दल या गव्याचा शोध घेत होते. परंतु तो सापडला नाही.

गेल्या काही दिवसांपासून सांगली आणि परिसरात गव्यांचा वावर वाढला आहे. त्यात कसबे डिग्रज येथील शेत, मळ्यात गव्याचे दर्शन झाले होते. त्यापूर्वी सांगलीच्या विश्रामबागेत गवा दिसला होता. गव्हर्मेंट कॉलनीतील रस्त्यावर महाकाय गवा दिसल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. त्यानंतर शनिवारी रात्री सांगलीवाडी परिसरात गव्यांचे दर्शन झाले. तो तेथील ऊसाच्या शेतात गायब झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button