breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

‘बिजली मल्ल’ म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते संभाजी पवार यांचे निधन

सांगली – ‘बिजलीमल्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेले भाजप नेते संभाजी पवार यांचे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. ते सांगलीचे आमदार होते. सांगली मतदारसंघातून ते चारवेळा आमदार म्हणून निवडून आले होते.गेली काही वर्षे ते पार्किन्सनच्या आजाराने त्रस्त होते. गतवर्षी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार घेताना त्यांना करोनाची लागण झाली होती. मात्र त्यावरही त्यांनी हिमतीने मात केली होती. प्रतिस्पर्धी मल्लाला क्षणात धोबीपछाड देण्याची खासियत असणारे संभाजी पवार यांनी रविवारी रात्री अखेरचा श्वास घेतला.

वसंतरावदादा पाटील यांच्या हयातीत त्यांचे पुतणे सहकारमहर्षी विष्णुअण्णा पाटील यांचा सांगली मतदार संघातून विधानसभेला पराभव करून त्यांनी ‘जायंट किलर’ अशी ख्याती मिळवली. 1986 ते 1999 पर्यंत तीनवेळा जनता दलाकडून, तर एकदा 2009 ते 2014 ला भाजपच्या तिकिटावर आमदार झाले होते. 2014 नंतर ते राजकारणापासून काहीसे लांब झाले होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, बंधू, पुतणे असा मोठा परिवार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button