breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोरे वस्ती भागातील सोसायट्यांमध्ये विकास कामांचा धडाका

  • भाजपाचे युवा नेते पांडा साने यांनी घेतला पुढाकार
  • पेव्हिंग ब्लॉक, पाणी पुरवठा, रस्त्याची कामे लागणार मार्गी

पिंपरी / महाईन्यूज

चिखलीतील मोरे वस्ती भागात सोसायटीतील रहिवाशांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा कार्यकर्ते पांडा साने यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सोसायट्यांमधील पेव्हिंग ब्लॉक, पाणी पुरवठा आणि रस्त्याची कामे मार्गी लावण्याचा रहिवाशांना केवळ शब्द दिला नाही, तर प्रत्यक्षात कामाला सुरूवात केली आहे.

चिखली परिसरातील सोसायट्या, कॉलनी, वस्ती परिसरामध्ये असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत. पालिका प्रशासनाने पिंपरी-चिंचवडमध्ये पूर्णवेळ पाणी पुरवठा देण्यासाठी पायाभूत प्रकल्प राबविला आहे. मात्र, तरीही चिखली परिसरातील नागरिकांना पाण्याच्या समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, रस्त्यांची दुरवस्ता झाली आहे. प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही अधिकारी दखल घेत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्याचबरोबर सोसायटी परिसरातील नागरिकांची पेव्हिंग ब्लॉक बसविण्याची मागणी होती. त्याकडेही दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी साने यांच्याशी या कामासंदर्भात चर्चा केली.

नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी साने यांनी तातडीने आमदार लांडगे यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सूचनेप्रमाणे कामाला सुरूवातही केली. समोर उभे राहून त्यांनी कामाचा आढावा घेतला आहे. दर्जेदार काम करून नागरिकांची या त्रासातून सुटका करण्यासाठी त्यांनी जातीने लक्ष घातले आहे. पालिका प्रशासनाला ताळ्यावर आणून त्यांनी काही कामे सुरू केली आहेत. ही प्रलंबित कामे मार्गी लागत असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

———————–

तब्बल १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मोरे वस्ती भागात पक्का रस्ता केला जात आहे. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या लोकाभिमुख विकासकामांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून होणा-या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी नेहमीच पुढाकार असतो.

पांडा साने, युवा कार्यकर्ते, भाजपा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button