breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंतप्रधान मोदींची पुतणी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार ?

अहमदाबाद – गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 21 आणि 28 फेब्रुवारी रोजी दोन टप्प्यात होणार आहेत. 6 महानगरपालिकांच्या निवडणुका 21 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. मात्र गुजरातच्या स्थानिक निवडणुका सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. कारण या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींची पुतणी सोनल मोदी या अहमदाबाद महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे सांगितले जात आहे. सोनल या मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कन्या आहेत. सोनल यांना अहमदाबाद महापालिकेच्या बोडकदेव प्रभागातून संधी मिळू शकते. 40 वर्षीय सोनल मोदी या गृहिणी असून, त्या अहमदाबादच्या जोधपूर भागात राहतात.

याबाबत प्रल्हाद मोदी म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या भावाची मुलगी आहे म्हणून फक्त तिकीट दिले जाऊ नये. गुणवत्ता पूर्ण करत असेल तरच तिकिट द्यावे. माझी मुलगी लोकशाही असलेल्या देशात राहते आणि निर्णय घेण्यास ती स्वतंत्र आहे.तर दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी या निवडणुकीत क्षनेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिले नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता सोनल यांना तिकिट मिळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button