breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

तेलंगणामध्ये BRS आणि भाजपाची हातमिळवणी? BRS खासदाराचे सूचक विधान

Telangana Election Result 2023 : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. तेलंगणामध्ये BRS अर्थात भारत राष्ट्र समिती सत्तेतून पायउतार होऊन काँग्रेसला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे बीआरएसचे खासदार के. केशव राव यांनी एक सूचक विधान केलं आहे.

काँग्रेस एकट्याने ही लढाई लढत आहे. त्यांच्याकडे कुणीही समर्थक नाहीत. त्यांना त्यांच्या एकट्याच्या बळावर बहुमतासाठीच्या जागा जिंकाव्या लागणार आहेत. पण बीआरएसला गरज लागली तर भाजपा व एआयएमआयएम आम्हाला मदत करतील, असा मोठा दावा केशव राव यांनी केला आहे.

हेही वाचा  –  ‘देवळात घंटा बडवून..’; भाजपाच्या निवडणूक प्रचारनीतीवर संजय राऊतांची खोचक टीका 

मी आत्ता आकड्यांवर बोलू इच्छित नाही. कारण एग्झिट पोल्समधून आलेल्या आकड्यांनाही महत्त्व आहे. तुमच्याकडे तुमचा सर्व्हे आणि त्याचे निष्कर्ष आहेत. माझ्याकडे माझा अभ्यास आणि त्याचे निष्कर्ष आहेत. एग्झिट पोलबाबत बोलायचं झालं तर त्यांनी काँग्रेसला तेलंगणामध्ये मोठी आघाडी सांगितली आहे. पण माझ्या अभ्यासानुसार आम्हाला तेलंगणामध्ये आरामात बहुमत मिळत आहे. त्यामुळे बीआरएस राज्यात सरकार स्थापन करेल, असंही केशव राव म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button