Uncategorized

भाजप नगरसेवक पूरग्रस्तांसाच्या मदतीसाठी एक महिन्याचे मानधन देणार

पिंपरी – पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे नगरसेवकही पूरग्रस्तांसाच्या मदतीसाठी एक महिन्याचे मानधन देणार आहेत. ज्या भागांमध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या नुकसानग्रस्त भागात उपाययोजना, मदतीसाठी भाजपच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन देण्यात येणार असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले.

राज्यात मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळून झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आल्याने नागरीवस्तीत व नगरांमध्ये पुराचे पाणी शिरुन जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. यामुळे ज्या भागांमध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथील नागरिकांना मदतीची आवश्यकता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात महापुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान होवून जिवीतहानीही झाली आहे.

या नुकसानग्रस्त भागात उपाययोजना व मदतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे, असे महापौर ढोरे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button