breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

एटीएसची मोठी कारवाई; जुनैद महमंदच्या साथीदारास काश्मीरमध्ये अटक

पुणे : लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडीतून अटक केलेल्या जुनैद महंमद अता महंमद याच्या साथीदाराला काश्मीर येथे अटक केली आली आहे. आफताब हुसैन शाह (वय २८, रा. किश्‍तवार, जम्मू आणि काश्मीर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून तो जुनैद आणि लष्करे तैयबा यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचा पोलिसांना संशय आहे.

जुनैदला मागच्या महिन्यात अटक केल्यानंतर एटीएसच्या पथकांनी कारगील, गंधरबल, श्रीनगर परिसरातील विविध ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने शोध मोहीम राबवली. या तपास पथकाने श्रीनगरपासून २९१ किलोमीटर अंतरावर असलेल्या किश्‍तवार या ठिकाणी आफताबला ताब्यात घेतले. आफताबला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायाल्याने त्यास तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर करून एटीएसच्या ताब्यात दिले. एटीएसचे पथक त्याला घेऊन पुण्याकडे रवाना झाले आहे. आफताब फर्निचरची कामे करतो. जुनैद आणि लष्करे तैयबा यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून त्याने काम केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्या चौकशीत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विविध राज्यांतील तरुणांना लष्करे तैयबा दहशतवादी संघटनेत भरती करण्यासाठी; तसेच दहशतवादी कारवायांच्या प्रशिक्षणासाठी जम्मू-काश्मीर येथे पाठविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा संशय असलेल्या जुनैदची पोलिस कोठडीची मुदत आज, शुक्रवारी संपत आहे. दहशतवादी कारवाई करण्यासाठी त्याला जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांनी पैसे पुरविल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

जुनैदला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. एटीएसच्या सहायक पोलिस आयुक्त अरुण वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंजूषा भोसले तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button