breaking-newsताज्या घडामोडी

BJP : सोलापूरचे भाजपा खासदार अडचणीत; पद धोक्यात

सोलापूर । महाईन्यूज । प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महाराज अडचणीत आले आहेत. जात पडताळणीत समितीने खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचे म्हटले आहे, असा दावा प्रमोद गायकवाड यांनी केला आहे.

खासदार जयसिदेश्वर महास्वामींच्या बेड जंगम जात प्रमाणपत्रावरील सुनावणी 15 फेब्रुवारीला पूर्ण झाली होती. या सुनावणीत खासदारांच्या वकिलामार्फत सादर करण्यात आलेले 12 अर्ज समितीने फेटाळून लावले होते. तर तक्रारदारांनी सादर केलेला साक्षीदार पडताळणीचा अर्जही समितीने फेटाळला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार डॉ . जयसिदेश्वर शिवाचार्यांनी सादर केलेला बेड जंगम जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी केली होती. त्या अर्जावर सुनावणी झाली असून अंतिम निर्णय पोष्टाने तक्रादारांना कळविण्यात येणार असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. दरम्यान जात पडताळणी समितीने सांगूनही महास्वामींच्या ज्या मूळकागदपत्राबाबत तक्रादाराने आक्षेप घेतला होता, ती कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे महास्वामीजींची खासदारकी धोक्यात आली आहे.

सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी आनंददायी बातमी…

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोघांनाही महास्वामींनी पराभवाची धूळ चारली होती. जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवत ते ‘जायंट किलर’ ठरले होते. खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांची खासदारकी धोक्यात आल्यामुळे सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी आनंददायी बातमी ठरली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button