breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हरिपाठ न आल्याने विद्यार्थ्याला मारहाण; भगवान महाराजाला अटक

आळंदी |महाईन्यूज|

हरिपाठ न आल्याने आपल्या शिष्याला बेदम मारहाण करणाऱ्या भगवान महाराज पोव्हाणेला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. अकरा वर्षीय ओम चौधरी हरिपाठ आणि अभ्यास करत नसल्याच्या कारणावरुन आरोपीने त्याला बेदम मारहाण केली होती. जबर मारानंतर शनिवारपर्यंत ओम बेशुद्ध अवस्थेतच होता. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असलेल्या ओमच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहितीही पोलिसांनी यावेळी दिली.

पोलिस निरीक्षक रवींद्र चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही डॉक्टरांच्या अहवाल आणि पालकांच्या तक्रारीवरुन भगवान महाराज पोव्हाणेवर गुन्हा दाखल केला होता. परभणी येथून आरोपीला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ते म्हणाले. १० फेब्रुवारीला महाराजाने अकरा वर्षीय ओम चौधरीला मारहाण केली होती.

मारहाणीनंतर महाराजाने ओमला औरंगाबादला नेले. यावेळी ओम बेशुद्ध अवस्थेत होता. त्याने विद्यार्थ्याच्या आईला तो आजारी असल्याची थाप मारली होती. त्यानंत त्याला पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे ओमला पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button