breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

राज ठाकरेंना धक्का, शिशीर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर ?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खंदे समर्थक शिशीर शिंदे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिशीर शिंदेंनी गेल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, पुढील राजकीय वाटचालीबाबत प्रदीर्घ चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीवेळी रणनीतींपासून दूर ठेवल्याने शिशीर शिंदे पक्षावर नाराज होते. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून, मनसेच्या नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती केली होती.

राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये शिशीर शिंदे यांचा समावेश होता. त्यामुळे मनसेतील अनुभवी आणि जाणते नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मनसेने 2009 साली लढविलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शिशीर शिंदे भांडूप (प.) विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

शिशीर शिंदेंचा राजकीय प्रवास

64 वर्षीय शिशीर शिंदे यांनी आपली राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरु केली.
1992 साली ते शिवसेनेचे मुलुंडचे नगरसेवक होते.
शिवसेनेने त्यांना उपनेतेपद दिलं होते
बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी वानखेडे मैदानाची खेळपट्टी उखडली होती.
1996 ते 2002 या काळात ते विधानपरिषदेचे सदस्य होते.
त्यांनी 2006 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करत, राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला.
मनसेकडून त्यांनी 2009 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती, मात्र तिथे त्यांचा पराभव झाला.
त्याच वर्षी शिशीर शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला होता. मात्र विधानसभा सभागृहात शपथघेण्यापूर्वीच त्यांना मुंबई आणि नागपूर विधानसभेतून चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button