breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची वेळ’; तरुणाच्या ट्वीटनंतर जितेंद्र आव्हाड संतापले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात सादर केलेल्या कवितेवरून सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे. पवार यांनी हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे, भाजपने अर्धवट व्हिडिओ शेअर करून दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह शब्दांत ट्वीट (Controversial Tweet) केलं असून यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर तरुणाची वादग्रस्त पोस्ट शेअर करत मुंबई पोलिसांकडे सदर तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘काय पातळीवर हे सगळे होत आहे? या विकृत इसमाविरुद्ध कडक कारवाई करा,’ असं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे.

  • तरुणाच्या वादग्रस्त पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?

‘बागलाणकर’ नावाच्या ट्विटर हँडलवर आक्षेपार्ह मजकूर वापरत एक पोस्ट लिहिण्यात आली आहे. ‘वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची…’ असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

  • नेमका काय आहे वाद?

शरद पवार यांचा एक व्हिडिओ भाजपकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. पवार यांनी हिंदू देवी-देवतांचा बाप काढत अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. पवार नेहमीच हिंदू धर्माची बदनामी करतात. जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते, असा निशाणा साधत भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शरद पवार यांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्वीट करण्यात आला होता. यावर राष्ट्रवादीनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. ‘झूठ की उम्र तब तक होती है जब तक सच का सामना नहीं होता. भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष आहे हे आता सर्वज्ञात आहे, पण अर्धे मुर्धे व्हिडिओ दाखवून, अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही. निदान पूर्ण व्हिडिओ दाखवण्याची अर्धांश हिम्मत तरी ठेवायची होती,’ असा पलटवार राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button