breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

“एकेकाळी कार्यकर्त्याला जी पदे दिली आज त्या पदावर शिवतारेंना समाधान मानावं लागतं आहे”; सचिन अहिर

हा एक प्रकारे पुरंदरच्या जनतेचा अपमान आहे- सचिन अहिरे

पुणे : एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले माजी मंत्री विजय शिवतारे हे शिवसेनेत असताना मोठे नेते म्हणून वावरत होते. मात्र एकेकाळी साधा कार्यकर्ता किंवा पीएला त्यांनी जी पदे दिली. आज त्या पदावर त्यांना समाधान मानावं लागतं आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी विजय शिवतारे यांना लगावला आहे.

शिवतारे यांना कॅबिनेट मंत्रिपदाच्या समतुल्य महामंडळ मिळायला पाहिजे होते. पण तस काहीच झालं नाही. हा एक प्रकारे पुरंदरच्या जनतेचा अपमान आहे, असंही सचिन अहिरे म्हणाले. ते पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना निरा येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिवतारेंवर टीका केली.

आगामी जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवण्याची आमची तयारी आहे. मात्र आघाडीचा जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल. मात्र तरी देखील स्वबळाची तयारी ठेवली पाहिजे. प्रत्येक जिल्हा परिसरात, गणात आम्ही आज आलो आहोत, तसेच प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद आपण आगामी निवडणूक स्वबळावर लढावी, असा निर्धार यावेळी सचिन अहिरे यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button