breaking-newsताज्या घडामोडी

कोरोनाच्या भीतीपोटी नागपुरात मास्कची विक्री वाढली

नागपूर | महाईन्यूज

देशात कोरोना विषाणूचे पाच रुग्ण आढळले असले तरी महाराष्ट्रात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. परंतु संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. नागपुरात तीन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे खबरदारी म्हणून लोकांकडून व प्रवाशांकडून ‘एन-९५’ मास्कची मागणी वाढली आहे. पूर्वी नागपुरात जिथे दिवसभरात २०० ते ५०० मास्कची विक्री व्हायची ती संख्या आता तीन हजाराच्या घरात गेली आहे. ही मागणी अशीच राहिल्यास तुटवडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उपराजधानीत कोरोना विषाणूला घेऊन सतर्कता पाळली जात आहे. मेडिकलमध्ये वॉर्ड क्र. २५ सज्ज करून ठेवण्यात आला आहे. येथे व्हेंटिलेटरसह औषधोपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपुरात जे तीन संशयीत रुग्ण आढळून आले होते त्यांना याच वॉर्डात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. नंतर त्यांचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button