breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मोठी बातमी : नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाची यशस्वी खेळी; महाविकास आघाडीची ४९ मतं फुटली!

नागपूर । प्रतिनिधी

विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला असून या निवडणुकीत महाविकास आघाडीची तब्बल ४९ मतं फुटली आहेत. भाजपानं या निवडणुकीत यशस्वी खेळी खेळली असून त्याचा फटका महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना बसला आहे.

भाजपाचे चंद्रशेखन बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली तर काँग्रेसनं ऐनवेळी पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मते पडली. तर काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांना १ मत तर ५ मते अवैध ठरली. चंद्रशेखर बावनकुळे यांचा १७६ मतांनी दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत एकूण ५५९ मते होती. त्यातील ५ जणांनी मतदान केले नाही. ५५४ जणांपैकी ३६२ मतं भाजपा उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पारड्यात पडली.

विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपाकडे केवळ ३२५ हक्काची मते होती. त्यातील एकही मत फुटू नये म्हणून भाजपानं मतदारांना पर्यटनासाठी पाठवलं होतं. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, छोटू भोयर १ आणि मंगशे देशमुख यांना १८६ मते मिळाली.

काँग्रेसचा दावा ठरला फोल

मतमोजणीच्या पूर्वसंध्येला भाजपा व कॉंग्रेस दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा करण्यात आला. मतदारांची संख्या जास्त असल्याने सुरुवातीपासूनच भाजपाकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. बावनकुळे यांना चारशेहून अधिक मतं मिळतील, असा दावा करण्यात येत होता. तर कॉंग्रेसच्या नेत्यांनी २८० च्या जवळपास मत मिळतील, अशी भूमिका मांडली. ग्रामीण भागात भाजपाच्या ४२ मतांना फोडण्यात यश आल्याचे मंत्री सुनील केदार यांचे समर्थक सांगत होते. मात्र काँग्रेसने केलेला सर्व दावा आता फोल ठरल्याचं निकालातून स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत ९८.९३ टक्के मतदान झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button