TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मोठी बातमी : अंधेरी पूर्वची जागा भाजपा लढवणार ; शिंदे गट नाही!

मुंबई : भाजपाची ताकद ‘ बाळासाहेबांच्या शिवसेनेपेक्षा ‘ अधिक असल्याने आणि त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवारच नसल्याने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे मुरजी पटेल हेच ‘‘कमळ’’ चिन्हावर लढणार आहेत. शिवसेनेची विजयी जागा असल्याने या जागेवर मुख्य मंत्री एकनाथ शिंदे गटाने हक्क सांगितला, मात्र या मतदारसंघात आपणच अधिक प्रभावशाली असल्याचे पटवून देत भाजपने जागावाटपात ही जागा आपल्याकडे खेचली. त्यामुळे जंग जंग पछाडून शिंदे गटाने मिळविलेली ढाल-तलवार निवडणूक आखाड्याबाहेरच राहणार आहे.
शिंदे गटाने ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार रुतुजा लटके यांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला व मंत्रीपदाचे आमिषही दाखविल्याचा आरोप झाला. पण त्या बधल्या नाहीत. शिंदे गटाने शिवसेनेच्या एका नगरसेवकालाही लढविण्याचा विचार केला होता. भाजपचे मुरजी पटेल हे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे विश्वासू असून त्यांची युतीचे उमेदवार म्हणून शेलार यांनी घोषणाही काही दिवसांपूर्वी निवडणूक कार्यालय उद्घाटनाच्या वेळी केली होती व त्यांनी कामही सुरू केले होते. ठाकरेंच्या शिवसेनेला तुल्यबळ उमेदवार न मिळाल्याने शिंदे यांनी पटेल यांनाच ढाल-तलवार चिन्हावर निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला. मात्र तो भाजप नेत्यांनी व पटेल यांनी फेटाळला. त्यामुळे अखेर रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीच्या सत्रात शिंदे गटाने माघार घेतली आणि भाजपने मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button