TOP Newsताज्या घडामोडीनाशिकमराठवाडामहाराष्ट्र

धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ बुधवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास भीषण अपघात

धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ बुधवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास भीषण अपघातात शासकीय कामासाठी नाशिक येथे जात असलेले अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जागीच ठार, तर चालक जखमी झाला आहे. चौधरी यांच्याकडे यावलच्या गटविकास अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार होता.

यावल येथून बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास चौधरी हे चालकासह नाशिककडे शासकीय कामासाठी मोटारीने जात असताना धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ पावणेसहाच्या मोटारीची मालमोटारीला धडक बसली. त्यात चालकाच्या बाजूला बसलेले चौधरी हे जागीच ठार, तर चालक जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. चौधरी यांचा मृतदेह अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मितभाषी व मनमिळावू असलेले एकनाथ चौधरी हे मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या अमळनेर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे यावल येथील गटविकास अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभारही होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button