breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दापोडीत पोलिसांची रोडरोमियोंवर धडक कारवाई

पिंपरी |महाईन्यूज|

दापोडी येथील शाळा परिसरात शाळकरी मुलींना छेडछाडीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मुली, पालक, शिक्षकांमधून याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. परिसरात टवाळखोर रोडरोमियोंचा त्रास वाढत गेल्याने शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत रस्त्यावरून येताजाता मुलींना छेडछाड, अश्लील शेरेबाजी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज (गुरूवार) भोसरी पोलिसांकडून शाळा परिसरातील अशा टवाळखोर रोडरोमियोंवर धडक कारवाई करत चोप देण्यात आला.

याचबरोबर येथील जनता शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद शाळेत नववी व दहावीच्या मुलींसाठी मार्गदर्शनपर उद्बोधन वर्ग घेवून सुरक्षाविषय घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याच बरोबर शाळा परिसरात पोलिसांकडून  नियमित गस्त वाढवण्यात आल्याने पालक, शिक्षक, विद्यार्थींनीमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी प्राचार्य राम गोन्टे, उपप्राचार्या अंजली घोडके, पर्यवेक्षक व जनता शिक्षण संस्थेचे सचिव सुभाष गारगोटे,विश्वास जाधव,शिवसेना पदाधिकारी प्रमोद गायकवाड व राहुल जाधव हे ही उपस्थितीत होते. भोसरी पोलिस ठाण्याचे निरिक्षक शंकर अवताडे उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलिस निरिक्षक शंकर अवताडे म्हणाले, ”अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मुलींनीही काळजी घेतली पाहिजे. वेळोवेळी आपले पालक, शिक्षक यांना स्वताला होणाऱ्या त्रासाची माहिती दिली पाहिजे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button