breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

BIG NEWS: मदिराप्रेमींची चिंता मिटली… राज्य सरकारकडून आता घरपोच दारू..!

मुंबई ।महाईन्यूज । प्रतिनिधी

राज्यात आता मद्यविक्रीची होम डिलिव्हरी करण्यास म्हणजेच घरपोच सेवा पुरवण्यास महाराष्ट्र सरकारने सशर्त संमती दिली आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला. या काळात जीवनावश्यक सेवा वगळता सारी दुकानं बंद करण्यात आली. मात्र केंद्र सरकारने ३ मेनंतर दिलेल्या निर्देशांनुसार काही सेवा सुरु करण्यात आल्या. ज्यामध्ये मद्यविक्रीचा परवाना असलेली दुकानं उघडण्याची सशर्त संमती देण्यात आली.

मात्र, त्या अटींचं उल्लंघन होऊ लागल्याने मुंबई-पुणे आणि इतर शहरांमध्ये मद्यविक्री बंद करण्यात आली. आता राज्य शासनाने मद्याची घरपोच डिलिव्हरी देण्यासाठी सशर्त संमती दिली आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी १४ तारखेला सकाळी १० वाजल्यापासून मद्याची घरपोच सेवा देण्यास सुरुवात होईल अशी माहिती दिली आहे. मात्र यावेळी काही अटी आणि शर्थीही लागू करण्यात आल्या आहेत. “फक्त परवाना असणाऱ्या मद्य दुकानांना ही सेवा देता येणार आहे. सोबतच ज्यांच्याकडे परमिट आहे त्यांनाच ही सेवा घेता येणार आहे. याशिवाय घरपोच सेवा देण्याची जबाबदारी मद्य दुकानाच्या मालकावर असणार आहे. सोबतच डिलिव्हरी बॉयची वैद्यकीय तपासणी आवश्यक असणार आहे,” अशी माहिती कांतीलाल उमाप यांनी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परमिट ऑनलाइन मिळेल याची सुविधाही उपलब्ध असल्याचं कांतीलाल उमाप यांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button