breaking-newsराष्ट्रिय

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी आणखी एक आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बॅंकेच्या घोटाळ्यात सीबीआयने आणखी आरोपपत्र आज दाखल केले आहे. या आरोपपत्रात नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्‍सी याला फरार आरोपी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या घोटाळा प्रकरणात सीबीआयने आणखी एक 12 हजार पानी चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये नीरव मोदीपाठोपाठ मेहुल चोक्‍सीलाही फरार म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, पंजाब नॅशनल बॅंकेतील घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने सोमवारीही आरोपपत्र दाखल केले. बॅंकेच्या तत्कालीन प्रमुख आणि अलाहाबाद बॅंकेच्या विद्यमान व्यवस्थापकीय संचालक उषा अनंतसुब्रमण्यम यांचा देखील या घोटाळ्यात सहभाग असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपपत्रात नीरव मोदी, त्याचा भाऊ निशाल मोदी, सुभाष परब यांच्या घोटाळ्यातील सहभागाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

मात्र मेहुल चोक्‍सीचे नाव त्या चार्जशीटमध्ये कुठेही नव्हते. आता दुसऱ्यांदा दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये मेहुल चोक्‍सीचे नाव वॉन्टेड आरोपी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. उषा अनंतसुब्रमण्यन 2015 ते 2017 या कालावधीत पीएनबीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. या प्रकरणात त्यांची चौकशी देखील झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button