breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

भारतात पालीच्या नव्या प्रजातींचा शोध

जमिनीसह दगडांवर देखील वास्तव्य

पूवरेत्तर भारतात वाकलेल्या व सच्छिद्र पालींच्या(बेन-टोंड गेको) सहा नव्या प्रजातींचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. घरात आढळणाऱ्या पालींपेक्षा या अतिशय वेगळ्या असून जमिनीवर तसेच दगडांवर देखील राहतात. ही प्रजाती फक्त पूवरेत्तर भारतातच आढळत असून ‘टॅक्सोनॉमिक जर्नल झुटा’मध्ये सोमवारी या संशोधनावरील पेपर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जागतिक पातळीवर सुमारे २५० पेक्षा अधिक पालींच्या प्रजाती आहेत.  या वर्षांच्या सुरुवातीला हिमालय आणि पूवरेत्तर भारतातून या सहा नव्या प्रजातींचा शोध लागला. हिमालयातील चार आणि पुवरेत्तर भारतातील ११ प्रजातींपैकी या संपूर्ण वर्षांत एकूण नऊ प्रजातींचा शोध लागला आहे. शेजारील म्यानमार मध्येही  २०१७ पासून २० नव्या प्रजातींचा शोध घेण्यात आला आहे. इंडो-बर्मादरम्यान असलेल्या समृद्ध जैवविविधतेतून या नव्या प्रजाती मिळत आहेत. यापूर्वी कधीही या पद्धतीने संशोधन झाले नव्हते. गुवाहाटी येथून मिळालेल्या प्रजातीला ‘सायट्रोडॅक्टिलस गुवाहाटीनेस’ किंवा ‘गुवाहाटी बेंट-टोंड गेको’ असे नाव देण्यात आले आहे.

नागालँडमधील प्रजातींचे नाव ‘सायट्रोडॅक्टिलस नागालँडेसिस’ किंवा ‘नागालँड बेंट-टोंड गेको’, आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील प्रजातीला ‘सायट्रोडॅक्टिलस काझीरंगासिस’ किंवा ‘काझिरंगा बेंट-टोंड गेको’, मेघालयातील जैन्तीया पहाडीवरुन मिळालेल्या सर्वात मोठय़ा भारतीय पालीला ‘सायट्रोडॅक्टिलस जैन्तीयानिसासिस’ किंवा ‘जैन्टीया बेंट-टोंड गोको’, त्रिपुराच्या जम्पुई पहाडावरुन मिळालेल्या प्रजातीला ‘सायट्रोडॅक्टिलस माउंन्टन्स’ किंवा ‘जम्पुई बेंट-टोंड गेको’, आसामच्या अभयपूरीजवळून मिळालेल्या प्रजातीला ‘सी सेप्टेंट्रीओनॉलीस’ किंवा ‘अभयापुरी बेंट-टोंडो गेको’ असे नाव देण्यात आले आहे.

आणखी १२ हून अधिक प्रजातींची शक्यता

या पाली प्रामुख्याने रात्री आणि दगडांवर अधिक राहतात, पण स्थानिकांना त्यांच्यातील वैविध्य माहिती नसते. पूवरेत्तर भारतात कदाचित आणखी १२ हून अधिक बेंट-टोंड गेकोच्या प्रजाती असू शकतात, असे मुख्य लेखक इशान अग्रवाल म्हणाले. बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सच्या सेंटर फॉर इकॉलॉजी सायन्सेस येथून आचार्य पदवी मिळवल्यानंतर त्यांनी यावर काम सुरू केले होते. दुसरे लेखक वरद गिरी हे नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसच्या नैसर्गिक इतिहास संकलनाचे माजी अभिरक्षक आहेत. आर. चैतन्य हे बंगळुरूचे संशोधक असून पालींवर काम करत आहेत. स्टीफन मोहनी हे लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे संशोधक आहेत. प्रा. अरुण बाऊर हे अमेरिकेतील व्हिल्लानोवा विद्यापीठाशी संबंधित आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button