ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशी येथील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भास्कर शिवले प्रथम

भोसरी : डेव्हलपमेंट फाउंडेशन फॉर महाराष्ट्र, स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, कविता भोंगाळे युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूल मोशी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रोख ११०००रुपये, चषक व प्रमाणपत्र असे पारितोषिक असलेला प्रथम क्रमांक खेडच्या कु. भास्कर येवले याने पटकवले. तसेच रोख ७०००रुपये, चषक व प्रमाणपत्र पारितोषिक असलेला व्दितीय क्रमांक गोखले नगर येथील कु. द्वितीय रोहन कवडे व रोख ५०००रुपये, चषक व प्रमाणपत्र असलेला तृतीय क्रमांकाचा मानकरी नवी पेठ पुणे येथील कु. शार्दूल भेगडे ठरला.

या स्पर्धेचा शुभारंभ स्वामी विवेकांनंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त सौ.कविता भोंगाळे व शिक्षण अधिकारी श्री. संजय नायकवडे यांच्या हस्ते झाला. शेकडोच्या संख्येने संपूर्ण पुणे जिल्ह्यातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. पारितोषक वितरण सोहळा स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.विनायकजी भोंगाळे, डेव्हलपमेंट फाउंडेशन फॉर महाराष्ट्र संस्थेचे श्री. सुजित शिळीमकर आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

हेही वाचा – महापालिका रुग्णालयांमधील सेवा-सुविधांबाबत ‘ऑडिट’ करा! 

यावेळी बोलताना सौ.कविता भोंगाळे म्हणाल्या की उपमुखमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून या संस्थेद्वारे राज्यातील तरुनांच्या कलात्मक गुणांना व वक्तृत्वाला वाव मिळावा यासाठी संस्थेच्या वतीने सदर राज्यस्तरिय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले. आगामी काळात देखील विविध लोकपयोगी सामाजिक उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात येणार आहेत.

संस्थापक अध्यक्ष श्री. विनायक भोंगाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की तरुणांनी स्वतःच्या कौशल्यांचा वापर स्वतःच्या प्रगती सोबत देशाच्या विकासासाठी करावा यातून आपला देश जागतिक महासत्ता बनेल. देशाला पोसणाऱ्या बळीराजाला, दिवस रात्र डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करणाऱ्या जवांनाना कधीही विसरू नका असे आवाहन केले.

यावेळी संस्थेच्या विश्वस्त सौ सरिता विखे, संस्थेच्या ऑपरेशनल हेड सौ. रूपाली बोबडे, श्री.सिद्धार्थ भोजने आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेचे उत्कृष्ठ परीक्षण सौ. कामिनी चौहान,सौ. दिव्या भोसले, श्री किरण कदम, दिनेश गाळकर यांनी केले. सूत्रसंचालन श्री राम शिंदे व आभार सौ.भारती पाटील यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button