TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

गोवरच्या संशयित रुग्णसंख्येत वाढ

मुंबई : मुंबई, मालेगाव, भिवंडीपाठोपाठ राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गोवरचा उद्रेक होत असून, रविवारी राज्यात गोवरचे निश्चित निदान झालेले रुग्ण आढळले नसले तरी संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात या एकाच दिवशी ३१० संशयित रुग्ण आढळून आले असून, संशयित रुग्णांची संख्या १० हजार ५४४ इतकी झाली आहे.

राज्यात गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रविवारी ३१० संशयित रुग्ण आढळून आले असून, रुग्णसंख्या १० हजार ५४४ झाली. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक ३ हजार ९४७ रुग्ण असून, त्याखालोखाल मालेगावमध्ये ७५७, भिवंडी महानगरपालिकेत ५०३, ठाणे महानगरपालिकेत ३६३, नवी मुंबई महानगरपालिकेत २१४, ठाणे जिल्ह्यामध्ये ११५, नवी मुंबई महानगरपालिकेत २१४, वसई विरार महानगरपालिकेत १६९ आणि पनवेल महानगरपालिकेत १३२ संशयित रुग्ण आढळले. त्याचप्रमाणे आतापर्यंत राज्यात गोवरचे ६२ भागात उद्रेक झाला असून मुंबईमध्ये २९ भागांत उद्रेक झाला आहे. तर २९२ गोवरचे रुग्ण आढळून. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. मालेगाव महानगरपालिकेत ११ भागांत उद्रेक झाला असून, ६२ रुग्ण बाधित झाले. भिवंडी महानगरपालिकेत १० भागांत उद्रेक, तर ४६ रुग्ण आढळून आले.

ठाण्यातील पाच भागांत उद्रेक

ठाणे महानगरपालिकेत ५ भागांत उद्रेक तर, ४४ रुग्ण, वसई विरार महानगरपालिकेत तीन भागांत उद्रेक तर, ११ रुग्ण, ठाणे जिल्ह्यात दोन भागांत उद्रेक तर १५ गोवरचे रुग्ण सापडले आहेत. पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेत प्रत्येकी एका भागात  उद्रेक झाला. पनवेलमध्ये पाच तर, नवी मुंबई महापालिकेत १२ गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button