breaking-newsपिंपरी / चिंचवड

#waragainstcorona: कोरोना योद्धांप्रती पिंपरी-चिंचवड महापालिका विशेष सभेत कृतज्ञता

पिंपरी ।महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात एखाद्या योध्दा प्रमाणे कोरोनाच्या या महासंकटात कार्यरत असलेले डॉक्टर, पोलीस, महापालिकेचे अधिकारी, सफाई कर्मचारी, मदतीला धावणारे सामाजिक संस्था आदींचे आभार मानत अभिनंदनाचा ठराव सर्व पक्षीय नगरसेवकांकडून महापालिकेच्या विशेष सभेत आज (दि.०१) मंजूर करण्यात आला. सोशल डिस्टंसिंगचे पालन करत महापालिका सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे या होत्या.

संपूर्ण देशात कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजला आहे. पुणे, मुंबईत मोठ्या संख्येने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या तुलनेत पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाला नियंत्रणात ठेवणे शक्य झाले आहे. शहरात काहीशा प्रमाणात हा आजार आटोक्यात ठेवण्यात यश मिळाले आहे. मृतांची संख्या देखील शहरात कमी आहे. शहरातील डॉक्टर, पोलीस, महापालिका अधिकारी, सफाई कर्मचारी यांनी या संकटात मोलाचे योगदान दिले आहे. या महामारीत अतुलनिय कामगिरी करणार्या कोरोना योध्दांचे अभिनंदन करण्याचा ठराव सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी महासभेत मांडला. माऊली थोरात यांनी त्यास अनुमोदन दिले. सर्व नगरसेवकांनी टाळ्या वाजवून कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन केले. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक अजित गव्हाणे, दत्ता साने, सुजाता पालांडे, केशव घोळवे, झामाबाई बारणे, आशा शेडगे, बाबा त्रिभुवन, संतोष लोंढे, राजू बनसोडे, अश्विनी चिंचवडे, संगीता ताम्हाणे, राहुल जाधव, अंबरनाथ कांबळे, संदीप वाघेरे, हर्षल ढोरे, उषा मुंढे, राजेंद्र गावडे, मंगला कदम, शत्रुघ्न काटे, सीमा सावळे, योगेश बहल, एकनाथ पवार, तुषार हिंगे, नामदेव ढाके यांनी मनोगत व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button