ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना लसीकरण करणा-या महिलेला मारहाण; लसीकरण केंद्रावरील सेल्फी पॉईंटचे नुकसान

पिंपरी चिंचवड | एका महिलेने कोरोना लसीकरण केंद्रावरील सेल्फी पॉईंटचे नुकसान करून लसीकरण करणा-या आरोग्य विभागाच्या कर्मचारी महिला आणि अन्य सहकारी महिलांना मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 17) दुपारी विठ्ठलनगर, नेहरूनगर येथे घडली.याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि. 18) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार तोडफोड आणि मारहाण करणा-या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगळवारी विठ्ठलनगर नेहरूनगर येथे साई लीला हाऊसिंग सोसायटीसमोर कोरोना लसीकरणाचे काम करत होत्या. दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास आरोपी महिला हातात चाकू घेऊन आली. तिने लसीकरण केंद्रावर लावलेल्या सेल्फी पॉईंटचे नुकसान केले. त्यांनतर फिर्यादी आणि त्यांच्या सोबतच्या सहकारी महिलांना खुर्ची व हाताने मारहाण केली. त्यानंतर सर्व स्टाफला शिवीगाळ करून धमकी देऊन महिला निघून गेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button