breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यात 798 उमेदवारांच्या निवडणूक लढण्याच्या अधिकारावर गदा

मुंबई | महाईन्यूज |

राज्यातील विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढविण्यासाठी उभे असलेल्या उमेदवारांचे भवितव्य 21 ऑक्टोबर रोजी मशिनबंद होणार आहे. त्यासाठी राज्यभरातील विविध मतदार संघातून तब्बल 5 हजार 543 उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्र जमा केली आहेत. त्यातील 4 हजार 739 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. म्हणजे, आता 804 उमेदवारांना निवडणूक लढता येणार नाही.

राज्यात अर्ज भरलेले ४ हजार ७३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपलं नशीब आजमावणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. त्यानंतर काही त्रुटी आढलेले अर्ज बाद करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

जिल्हानिहाय मतदार संघातील वैध अर्ज

मुंबई उपनगर – २५ मतदारसंघात २७२ अर्ज वैध (वांद्रे पश्चिमची माहिती उपलब्ध नाही), मुंबई शहर – १० मतदारसंघात ८४ अर्ज वैध, पालघर – ६ मतदारसंघात ६९ अर्ज वैध, ठाणे – १८ मतदारसंघात २५१ अर्ज वैध, रायगड – ७ मतदारसंघात ११२ अर्ज वैध, पुणे – २१ मतदारसंघात ३७२ अर्ज वैध, नागपूर – १२ मतदारसंघात १८१ अर्ज वैध, औरंगाबाद – ९ मतदारसंघात २०८ अर्ज वैध, सोलापूर – ११ मतदारसंघात २३७ अर्ज वैध, सातारा – ८ मतदारसंघात १०८ अर्ज वैध, रत्नागिरी – ५ मतदारसंघात ४० अर्ज वैध, सिंधुदूर्ग – ३ मतदारसंघात २७ अर्ज वैध, कोल्हापूर – १० मतदारसंघात १८६ अर्ज वैध, सांगली – ८ मतदारसंघात १११ अर्ज वैध, नाशिक – 15 मतदारसंघात २१२ अर्ज वैध, नंदुरबार – ४ मतदारसंघात ३६ अर्ज वैध, धुळे – ५ मतदारसंघात ५६ अर्ज वैध, जळगाव – ११ मतदारसंघात १५४ अर्ज वैध, बुलढाणा – ७ मतदारसंघात ७५ अर्ज वैध, अकोला – ५ मतदारसंघात १०१ अर्ज वैध, वाशिम – ३ मतदारसंघात ६० अर्ज वैध, अमरावती – ८ मतदारसंघात १५१ अर्ज वैध, वर्धा – ४ मतदारसंघात ५९ अर्ज वैध, भंडारा – ३ मतदारसंघात ६६ अर्ज वैध, गोंदीया – ४ मतदारसंघात ७१ अर्ज वैध, गडचिरोली – ३ मतदारसंघात ४४ अर्ज वैध, चंद्रपूर – ६ मतदारसंघात ९० अर्ज वैध, यवतमाळ – ७ मतदारसंघात १२५ अर्ज वैध, नांदेड – ९ मतदारसंघात ३२७ अर्ज वैध, हिंगोली – ३ मतदारसंघात ५४ अर्ज वैध, परभणी – ४ मतदारसंघात ८१ अर्ज वैध, जालना – ५ मतदारसंघात १३३ अर्ज वैध, अहमदनगर – १२ मतदारसंघात १८२ अर्ज वैध, बीड – ६ मतदारसंघात २०२ अर्ज वैध, लातूर – ६ मतदारसंघात १२० अर्ज वैध, उस्मानाबाद – ४ मतदारसंघात ८२ अर्ज वैध

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button